पोस्ट्स

भारताच्या नोटा-नाणी कोण छापतं?

इमेज
  भारताच्या नोटा-नाणी कोण छापतं? भारतात नोटा आणि नाणी यांच्याबाबतचे सर्व अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्याकडे आहेत. रिझर्व्ह बँकेतील सेंट्रल बोर्ड हे चलनी नोटांसंदर्भातील सर्व कामकाज पाहतं. तर नाण्यांचं काम केंद्र सरकार स्वतः पाहतं. जगभरातील इतर केंद्रीय बँकांप्रमाणेच नोटांची रचना किंवा डिझाईन बदलण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेलाच देण्यात आले आहेत. इंडियन एक्सप्रेस मधील बातमीनुसार, कोणत्याही नोटेच्या डिझाईनमध्ये काही बदल करावयाचे असल्यास RBI चं सेंट्रल बोर्ड आणि केंद्र सरकार या दोहोंकडून त्याला मंजुरी मिळणं आवश्यक असतं. तर नाण्यातील डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. फोटो स्रोत, RBI.ORG.IN Skip पॉडकास्ट and continue reading पॉडकास्ट तीन गोष्टी दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा भाग End of पॉडकास्ट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934  मधील सेक्शन 22 मध्ये यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक सर्वप्रथम नोटेचं डिझाईन बनवतं. त्यानंतर ते RBI सेंट्रल बोर्डकडे पाठवलं जातं. पुढे हे डिझाईन अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे ...

नोटांवर महात्मा गांधी कधी आले?

इमेज
 म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या. यावर महात्मा गांधींचं छायाचित्र पुन्हा एकदा आलं. आज आपल्या नोटेवर आहे त्याप्रमाणे समोरील बाजूस गांधींजींचा फोटो या नोटेवर लावण्यात आला. शिवाय, अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता. तर मागील बाजूल गांधीजींच्या दांडी यात्रेचा फोटो छापण्यात आला. फोटो स्रोत, RBI.ORG.IN सुरक्षिततेसाठीची नवीन फीचर्स असणाऱ्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा 1996 साली छापण्यात आल्या. यामध्ये वॉटरमार्कही बदलण्यात आले आणि अंध लोकांनाही नोटा ओळखता याव्यात यासाठीचे नवीन फीचर्स यामध्ये सामील करण्यात आले. पण महात्मा गांधीजींचा समोरून फोटो कायम राहिला.

भारतीय नोटांचा इतिहास जाणून घ्या सविस्तर

इमेज
  भारतीय नोटांचा इतिहास भारताच्या चलनी नोटा कोण छापतं आणि त्याची प्रक्रिया काय असते, याची माहिती घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नोटांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे. सध्या भारतीय चलनी नोटांवर समोरील बाजूस महात्मा गांधी यांचा फोटो दिसतो. पण आपल्या नोटांवर गांधीजींचा फोटो पूर्वी नव्हता, असं तुम्हाला सांगितलं तर? होय, भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण नोटांवर गांधीजींचा फोटो येण्यास 1969 सालचा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला. फोटो स्रोत, RBI फोटो कॅप्शन, रुपयाच्या जुन्या नोटा देश स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांतच महात्मा गांधी यांची हत्या झाली. दरम्यान स्वतंत्र भारताच्या नव्या नोटांचं डिझाईन करण्याचं काम सुरू होतं. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईट वरील माहितीनुसार, पहिल्यांदा भारत सरकारने 1949 साली एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. त्यावेळी नोटेवर पूर्वी असलेला ब्रिटनच्या राजाचा फोटो हटवून महात्मा गांधींचा फोटो लावण्यात येईल, असं मानलं जात होतं. त्यानुसार, एक डिझाईन बनवण्यातही आलं होतं. पण, अखेरीस महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर समितीचं एकमत...

रक्त चंदन” म्हणजे नेमके काय ? काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर

इमेज
 रक्त चंदन” म्हणजे नेमके काय ? काय आहेत त्याचे फायदे? जाणून घ्या सविस्तर ” रक्त चंदन ” म्हटले की बहुतेक जणांना चांदनाचाच प्रकार असावा, असे वाटते. परंतु खूप कमी लोकांना याची माहिती असल्याने येथे आवर्जून त्याची माहिती द्यावीशी वाटते…सफेद चंदनाचे फेस पॅक, अगरबत्ती, किंवा औषधी गुणधर्म सर्वानाच परिचित आहेत. परंतु रक्त चंदन आणि सफेद चंदन यात जमीन असमानाचा फरक आहे. तो कसा ते आपण जाणून घेऊयात. रक्त चांदनाला वैज्ञानिक भाषेत टेरोकार्पस सेंटनांस असेही संबोधले जाते. मुळात रक्त चंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो, त्यामुळेच या झाडाला “रक्त चंदन” असे म्हटले आहे. या झाडाचे वाळलेले लाकुडही लाल रंगाचेच असते.चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चांदनाप्रमाणे रक्त चांदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही. रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो.रक्तचंदन वृक्ष सु. ८ मी. पर्यंत उंच वाढतो. तो कमी मातीच्या जमिनीत वाढत असून त्याची वाढ जलद होते. तीन वर्षांत सु. ५ मी.पर्यंत त्याची उंची वाढते. त्याचे खोड सरळ वाढत असून साल खडबडीत असते. पाने संयुक्त व लहान असून त्याच्या लहान...

तुम्ही हापूस कसा ओळखणार?

इमेज
 देशभरात आंब्यांच्या अनेक जातीची लागवड केली जाते. पण, यामधील हापूस आंबा सर्वात लोकप्रिय आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते. बाजारात दिसणारा प्रत्येक पिवसर आंबा हा हापूसच आहे, अशी अनेक ग्राहकांची समजूत असते. अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा याबाबत खास टिप्स. ग्राहक मुख्यतः पिकलेला आंबा विकत घ्यायला बाजारात जातात. मात्र बाजारपेठेतील स्पर्धेमुळे बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असते. एखाद्या आंब्याला असलेल्या दरापेक्षा जास्त दर मिळावा, यासाठी विक्रेत्यांकडून ही फसवणूक केली जाते. तर ग्राहकालाही त्यातील फारसे ज्ञान नसल्यामुळे त्यांची नकळत फसवणूक होते. त्यावेळी तुम्ही अगदी मोजक्या निकषाच्या आधारावर फसवणूक थांबवू शकता. देवगडचा आंबा हा डोंगरी भागातून येतो. त्या प्रदेशात असणाऱ्या जास्त ऊन्हामुळे या आंब्याला वरच्या बाजूला लालसर रंग येतो. यावरून हा आंबा डोंगरी भागातून येणारा अस्सल देवगडचा आंबा आहे, हे लक्षात येऊ शकते. बाहेर असणाऱ्या केशरी रंगा प्रमाणेच आंबा कापून आतला रंग पाहिला, तर तो देखील केशरीच असतो. रत्नागिरीचा आंबा हा वरच्या बाजूने जास्त केशरी रंगाचा असतो. तो आतमध्येही केशरी...