भारतीय नोटांचा इतिहास जाणून घ्या सविस्तर

 

भारतीय नोटांचा इतिहास

भारताच्या चलनी नोटा कोण छापतं आणि त्याची प्रक्रिया काय असते, याची माहिती घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नोटांचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे.

सध्या भारतीय चलनी नोटांवर समोरील बाजूस महात्मा गांधी यांचा फोटो दिसतो. पण आपल्या नोटांवर गांधीजींचा फोटो पूर्वी नव्हता, असं तुम्हाला सांगितलं तर?

होय, भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण नोटांवर गांधीजींचा फोटो येण्यास 1969 सालचा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला.

रुपयाच्या जुन्या नोटा

फोटो स्रोत,RBI

फोटो कॅप्शन,

रुपयाच्या जुन्या नोटा

देश स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांतच महात्मा गांधी यांची हत्या झाली. दरम्यान स्वतंत्र भारताच्या नव्या नोटांचं डिझाईन करण्याचं काम सुरू होतं.

रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, पहिल्यांदा भारत सरकारने 1949 साली एक रुपयाच्या नोटेचं नवीन डिझाईन तयार केलं. त्यावेळी नोटेवर पूर्वी असलेला ब्रिटनच्या राजाचा फोटो हटवून महात्मा गांधींचा फोटो लावण्यात येईल, असं मानलं जात होतं.

त्यानुसार, एक डिझाईन बनवण्यातही आलं होतं. पण, अखेरीस महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी चलनी नोटेवर अशोक स्तंभ असावा, यावर समितीचं एकमत झालं

1950 मध्ये भारतीय प्रजासत्ताकात पहिल्यांदाच 2, 5, 10 आणि शंभर रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.

2, 5 आणि शंभरच्या नोटेच्या डिझाईनमध्ये फारसा फरक नव्हता, पण रंग वेगवेगळे होते. 10 रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूला शिडाच्या होडीचा फोटो तसाच ठेवण्यात आला होता.

1953 मध्ये नवीन चलनी नोटांवर हिंदी प्रामुख्याने छापण्यात आली. रुपयाचं बहुवचन काय असेल, याविषयी चर्चा झाली आणि रुपयाचं बहुवचन 'रुपये' असेल असं ठरलं.

रुपयाच्या जुन्या नोटा

फोटो स्रोत,RBI

1954 मध्ये एक हजार, दोन हजार आणि 10 हजार रुपयांच्या नोटा पुन्हा छापण्यात आल्या. 1978 मध्ये या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.

म्हणजे 1978 मध्ये एक हजार, पाच हजार आणि 10 हजार रुपयांची नोटबंदी झाली होती.

दोन आणि पाच रुपयांच्या लहान चलनी नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांचे फोटो छापण्यात आले होते. पण 1975 मध्ये 100 च्या नोटेवर कृषी स्वावलंबन आणि चहाच्या मळ्यातून पानं खुडतानाचे फोटो दिसू लागले.