भारताच्या नोटा-नाणी कोण छापतं?

 

भारताच्या नोटा-नाणी कोण छापतं?

भारतात नोटा आणि नाणी यांच्याबाबतचे सर्व अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि भारत सरकार यांच्याकडे आहेत.

रिझर्व्ह बँकेतील सेंट्रल बोर्ड हे चलनी नोटांसंदर्भातील सर्व कामकाज पाहतं. तर नाण्यांचं काम केंद्र सरकार स्वतः पाहतं.

जगभरातील इतर केंद्रीय बँकांप्रमाणेच नोटांची रचना किंवा डिझाईन बदलण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेलाच देण्यात आले आहेत.

इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार, कोणत्याही नोटेच्या डिझाईनमध्ये काही बदल करावयाचे असल्यास RBI चं सेंट्रल बोर्ड आणि केंद्र सरकार या दोहोंकडून त्याला मंजुरी मिळणं आवश्यक असतं.

तर नाण्यातील डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो.

भारतीय नोटा

फोटो स्रोत,RBI.ORG.IN

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 मधील सेक्शन 22 मध्ये यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक सर्वप्रथम नोटेचं डिझाईन बनवतं. त्यानंतर ते RBI सेंट्रल बोर्डकडे पाठवलं जातं. पुढे हे डिझाईन अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येतं. अशी नोटेचं डिझाईन बनवण्याची प्रक्रिया आहे.

कॉईनेज कायदा, 2011 नुसार नाण्यांवर भारत सरकारचा संपूर्ण अधिकार आहे. भारत सरकार नाण्यांचं डिझाईन बनवून नाणी तयार करून घेतं. पुढे ते वितरणासाठी रिझर्व्ह बँकेकडेच पाठवण्यात येतात.

नोटा आणि नाणी यांचं व्यवस्थापन रिझर्व्ह बँकेतील डिपार्टमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट (चलन व्यवस्थापन विभाग) हे विभाग करतं. रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी-गव्हर्नर

यांच्या अखत्यारित हा विभाग आहे. सध्या टी. रबि शंकर यांच्याकडे या विभागाची जबाबदारी आहे.

RBI च्या वेबसाईटमधील माहितीनुसार, चलन व्यवस्थापन विभाग हा चलनी नोटा आणि नाण्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो. चलनी नोटांचं व्यवस्थापन, जसं की, डिझाईन, छपाई आणि चलनी नोटांचा वेळेवर पुरवठा आणि चलनी नोटा काढणं आणि नाण्यांचं वितरण आदी काम विभागामार्फत केलं जातं.

बनावट नोटांचं चलन नियंत्रणात ठेवणे, नोटा आणि नाण्यांची देवाणघेवाण सुलभ करून करन्सी चेस्ट आणि लोकांसाठी ग्राहक सेवेची उपलब्धता यावर लक्ष ठेवणे, हे चलन व्यवस्थापन विभागाचं काम असतं.

नोटा-नाणे छपाई कुठे होते?

याशिवाय, नोटांच्या डिझाईनविषयक नियोजन, संशोधन करणे, नोटा आणि नाण्यांचा सुनियोजित पुरवठा करणे, रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार खराब झालेल्या नोटा परत घेऊन त्याची विल्हेवाट लावणे आदी कामंसुद्धा या विभागामार्फत केली जातात.

भारतात नोटांची छपाई नाशिक, देवास (मध्य प्रदेश), म्हैसूर (कर्नाटक) आणि सालबोनी (पश्चिम बंगाल) याठिकाणी होतं. तर नाण्यांच्या टांकसाळी मुंबई (महाराष्ट्र), अलीपूर (कोलकाता), सैफाबाद (हैदराबाद) आणि नोएडा (उत्तर प्रदेश) याठिकाणी आहेत.