नोटांवर महात्मा गांधी कधी आले?
म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या.
यावर महात्मा गांधींचं छायाचित्र पुन्हा एकदा आलं. आज आपल्या नोटेवर आहे त्याप्रमाणे समोरील बाजूस गांधींजींचा फोटो या नोटेवर लावण्यात आला. शिवाय, अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता. तर मागील बाजूल गांधीजींच्या दांडी यात्रेचा फोटो छापण्यात आला.
सुरक्षिततेसाठीची नवीन फीचर्स असणाऱ्या महात्मा गांधी सीरीजच्या नोटा 1996 साली छापण्यात आल्या. यामध्ये वॉटरमार्कही बदलण्यात आले आणि अंध लोकांनाही नोटा ओळखता याव्यात यासाठीचे नवीन फीचर्स यामध्ये सामील करण्यात आले. पण महात्मा गांधीजींचा समोरून फोटो कायम राहिला.

